• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

एरंडोल खून खटल्यातून आठ जणांसह माजी नगराध्यक्षांची निर्दोष मुक्तता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2023
in Uncategorized
0
शहरात अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत अत्याचार ; आरोपीला सश्रम कारावास


पोलीस, डॉक्टरांसह १८ साक्षीदारांची तपासणी ; जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

जळगाव (प्रतिनिधी) – कबड्डी सामन्यात वाद झाल्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. त्यात एरंडोलमधील तरुणाचा खून झाल्याचा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपजिल्हाप्रमुख दशरथ बुधा महाजन यांच्यासह अन्य नऊ जणांवर होता. याप्रकरणाची आज शनिवारी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमुर्ती शरद पवार यांच्या न्यायालयाने खून खटल्यातील आठही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यापैकी एकाचा पुर्वीच मधुमेहाने मृत्यू झाला होता.

एरंडोल तालुक्यात ६ जून २०१८ रोजी कबड्डीच्या सामन्यातून ज्युनिअर महाविद्यालयात दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादातून उमेश उर्फ खंडू अशोक पाटील यांचा खून झाला होता. या प्रकरणात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपजिल्हाप्रमुख दशरथ बुधा महाजन, पवन नारायण महाजन, पंकज राजमल नेरकर, भरत गोकुळ महाजन, राहुल रवींद्र महाजन, धीरज विजय पाटील, चेतन मधुकर पाटील, रितेश रामा माळी आणि स्वप्नील प्रसाद महाजन यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी चौघांची पुर्वीच जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. तर १६ जून २०१८ पासून दशरथ महाजन, पवन महाजन, पंकज नेरकर, भरत महाजन, राहुल महाजन हे जिल्हा कारागृहात बंदी होते. दरम्यान, पवन याला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या खून खटल्यादरम्यान न्यायालयाने एकुण १८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यात दोन पोलीस अधिकारी आणि तीन डॉक्टरांचा समावेश होता. घटनास्थळावरील सीसी टिव्ही फुटेज, वापरण्यात आलेली हत्यारे अन्य पुरावे आणि पोलिसांचा तपास यात बरीच तफावत असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले. तसेच पुर्वीच्या देखील जखमा मृत उमेश पाटील यांच्या अंगावर होत्या. त्यांचा खून चाकु आणि पाईपने करण्यात आला होता. घटनास्थळावरील पुराव्यांवरुन पोलीस देखील संभ्रमात होते. बचाव पक्षाच्या वतीने राहुल महाजन यांच्या बाजूने अ‍ॅड. सूरज जहांगिर, दशरथ महाजन यांच्यासह अन्य दोघांच्या बाजूने अ‍ॅड. अकील ईस्माईल तर पंकज नेरकर, पवन महाजन आणि भरत महाजन यांच्या बाजूने अ‍ॅड. ए. के. शिरोळे यांनी काम पाहिले. तर अ‍ॅड. व्ही. एच. पाटील आणि अ‍ॅड. सागर चित्रे यांनी मदत केली.


 

 

Previous Post

पारोळा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Next Post

जळगावात मूसळधार पावसामुळे भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात मूसळधार पावसामुळे भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon