अमेरिकेतील गांधी सोसायटीद्वारे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- नीर झाला यांनी अमेरिकेतील गांधी सोसायटीद्वारे आयोजित ‘Capturing Gandhiji’s Values Legacy and Impact’ या विषयावरील जागतिक वक्तृत्व स्पर्धेत प्रभावी सहभाग घेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या जागतिक स्पर्धेत विविध देशांतील ४,००० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.
पहिल्या टप्प्यात १,२००, दुसऱ्या टप्प्यात ४०० आणि अंतिम टप्प्यात केवळ ५० स्पर्धकांची निवड झाली. नीर यांनी त्यांच्या संवेदनशील आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर शीर्ष ५० मध्ये स्थान मिळवत १०,०००/- रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. नीर यांनी या पारितोषिक रकमेचा उपयोग गरजू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी केला, ज्यामुळे त्यांची सामाजिक जबाबदारीची भावना ही दिसून येते. महात्मा गांधींच्या शाश्वत विचारांवर चालत आजची मुले सशक्त समाजाची निर्मिती करत आहेत, याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया जैन समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली आहे. नीर झाला हा जैन हिल्स येथील गांधी तीर्थच्या शैक्षणिक विभागातील डॉ. अश्विन झाला आणि डॉ. निर्मला झाला याचा मुलगा आहे.