वरणगाव ( प्रतिनिधी ) — तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. वरणगाव येथील बस स्टॉप चौकात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.

केंद्रातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन कृषी कायदे बनवले आहेत. या कायद्याचा निषेध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला वरणगाव शहरातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा देत मोदी सरकारच्या विरोधात वरणगाव शहरातील बस स्टॅन्ड चौकांमध्ये घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली मोदी सरकारने त्वरित हे तिन्ही काय ते माघारी घ्यावे अशी मागणी या तिन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आली.







