रावेर तालुक्यातून विविध क्षेत्रातून अभिनंदन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निंभोरा येथे मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत नंदिनी अरविंद पंत यांनी भाग घेऊन सर्व महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांना भेटवस्तू साडी भेट देऊन बक्षीस देण्यात आली. हे यश संपादन केल्याबद्दल निंभोरा येथील पुरोहित सुभाष मधुकर जोशी तसेच पत्रकार राजीव बोरसे यांनी पुष्पगुच्छ देऊन पंत यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी अरविंद पंत हे देखील उपस्थित होते.
तसेच पंत यांनी स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल आ. अमोल जावळे, नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, हरलाल कोळी, दुर्गादास पाटील, पूनम पाटील, ललित कोळंबे, अमोल खाचणे, सचिन चौधरी, रवींद्र महाले, पत्रकार चंद्रकांत कोळी, प्रमोद रोझोदकर, विजय सोनार यासह आदींनी अभिनंदन केले आहे.