एरंडोल (प्रतिनिधी) – तालूक्यातील श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान येथील त्रैमासिक सभा नुकतीच कोरोना नियमांचे पालन करून विजय नामदेव भामरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी श्री महादेव मंदिर नूतनीकरण बाबत चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी निधी संकलनासाठी जेष्ठ विश्वस्त प्रकाश लोटन रोकडे यांनी 11000 रु. देणगी देण्याचे जाहीर केले तर महेश पाटील यांनी विश्वस्त यांनीही देणगी देण्याचा ठराव मांडला. यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. ऋषी पंचमी यात्रोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय परवानगी घेण्याचे ठरले. या निमित्ताने अध्यक्ष विजय भामरे यांनी सभेत सर्व विश्वस्त, सेवेकरी, पुजारी यांना श्री क्षेत्र सुकेश्वरच्या त्यागमय सेवाभावी परंपरेचा आदर्श घेऊन देवस्थान विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करून आपले कर्तव्य माजी व्यक्तींनी केलेल्या निस्वार्थ आणि निरंतर सेवेचे व्रत डोळ्यासमोर ठेऊन करावे अशी विनंती केली. श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थानचे माजी उपाध्यक्ष स्व. पंढरीनाथ कोळी यांचे नातू समाधान कोळी यांची देवस्थानच्या सचिवपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन विजय भामरे, उपाध्यक्ष, गोपाळ कोळी, विश्वस्त रमेश पाटील, मगन पाटील, महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमास विश्वस्त, पुजारी, सेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.







