तरूणांना मतदारयादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणा-या या कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.
एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी १ नोव्हेंबररोजी केल्यावर ३० नोव्हेबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी :देण्यात आला आहे. १३ व १४ आणि २७ व २८ नोव्हेंबर असे ४ दिवस ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे दावे व हरकती २० डिसेंबररोजी निकालात काढलय जाणार आहेत
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ५ जानेवारी २०२२ रोजी केलीय जाणार आहे
जिल्ह्यातील रहिवाशानी १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये फॉर्म – नमूना नं. 6 – नव्याने मतदार नोंदणीसाठी , फॉर्म – नमूना नं. 7 – मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी , फॉर्म – नमूना नं. 8 – मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्यासाठी व फॉर्म – नमूना नं. 8 अ – मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीसाठी भरून द्यावा लागणार आहे
नवतरुण तसेच इतर काही ज्यांची नावातील दुरुस्ती , कायमस्वरुपी स्थानात बदल , मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसिलदार , उपविभागीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील. यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.







