जळगाव (प्रतिनिधी) : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे नितीन पोपटराव बच्छाव यांची जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी बदली झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यानंतर शिक्षण विभागाला शिक्षणाधिकारी मिळाले आहेत.
शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांची बदली झाल्यानंतर पुढील सहा महिने कल्पना चव्हाण या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या. आता शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून अहमदनगर येथील निरंतर शिक्षणाधिकारी नितीन पोपटराव बच्छाव यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी विनंतीनुसार रिक्त पदावर बदली केली आहे.त्यामुळे सहा महिन्यांपासून दिसत असलेले पद आता भरले गेले आहे.