अहमदनगर ( वृत्तसंस्था )– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगारातील चालकाने आगारातच उभ्या केलेल्या एस.टी.बसच्या मागील बाजूस गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शेवगाव आगारातील एस.टी.चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी आज सकाळी आगारात उभ्या असलेल्या एस.टी.बसच्या मागील बाजूस गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली
घटनेची माहिती मिळताच आगारातील एस.टी.महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही मात्र आर्थिक पिळवणुकीच्या विरोधात राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांनी उपोषण आणि आंदोलनाची भूमिका घेतलेली असता घडलेल्या या घटनेमुळे आंदोलनकर्ते कर्मचारी प्रचंड संतापले आहेत .
काल काही वेळ राज्यात एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्या आधीच प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकणी या कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे राज्य सरकार अपेक्षेप्रमाणे आंदोलनाची दखल घेत नसल्याने त्यांच्यातील संताप दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे .