चि . विक्रम पाटील व चि सौ का प्रेरणा यांना भावी आयुष्यासाठी सदिच्छा

जळगाव ( प्रतिनिधी ) – 28 नोव्हेंबर हा बेनाम दिवस असल्याचा आरोप विरोधक करतात. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक असे म्हणत असले तरी आम्ही आमचं काम करत असून सामान्यांचे प्रश्न सोडवत आहोत. त्यामुळे कोण काय म्हणतो, याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नसल्याचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे .शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आदेश बांदेकर हे आजपाळधी येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या हळदीच्या समारंभासाठी आले होते. एकनाथ शिंदे यांनी वधु-वरांना आशिर्वाद देत भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
जळगावमधील नगरसेवकांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला त्यामुळेच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर झाला. शिवसेना लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवू शकते यासाठी जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर झाले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे यावर उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष हे विरोधी पक्षाचे काम करतात परंतु निवडून देणारे व सत्तेत बसवणारे सामान्य जनता आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी कामे करण्यात आली आहे त्यावर जनतेने समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे कोण काय बोलते , याची चिंता आम्ही करत नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षापासून काम करत आहे कोरोनाचे संकट असतानादेखील अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी या संकटावर मात केलेली आहे. त्यामुळे या नियोजनाचा भाग म्हणून कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. इतरही राज्यांनी आपल्या राज्याचं अनुकरण केले असून खर्च अधिक उत्पन्न कमी अशा परिस्थितीतही महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेगाने विकासकामे सुरू असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.







