जळगाव ( प्रतिनिधी ) – शालेय व जिल्हास्तरावर कलाशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पुण्याच्या आर्टबीट्स फौंडेशनकडून कला शिक्षक सुनिल दाभाडे यांना ” कला सन्मान” पुरस्कार देण्यात आला आहे
विद्यार्थ्यांमध्ये कलेची गोडी निर्माण करत कलाविषयक उपक्रम राबवून तसेच लॉकडाऊन काळात स्वखर्चाने रस्त्यावर कोरोनाविषयी चित्र रेखाटून जनजागृती, गरजू लोकांना खिचडी, चप्पल , फळ, कपडे, फराळ वाटप आणि चित्र, शिल्प, फलक रेखाटनातून निरंतर सामाजिक संदेश देऊन समाजजागृतीचे कार्य करत असल्याबद्दल पुण्याच्या आर्टबीट्स फौंडेशनकडून पर्यावरण मित्र, पक्षीमित्र, कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांना *कला सन्मान २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माजी शिक्षण उपसंचालक निळकंठ गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर , शिक्षणाधिकारी देवांग , माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर, डायट प्राचार्य अनिल झोपे, साहित्यिक डॉ.मिलींद बागुल ,तरसोद जि.प शाळेतील शिक्षक विजय लुल्हे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , महेंद्र पवार (नाशिक) , विजय पवार ( नाशिक ) , चित्रकार प्रेमकुमार सपकाळे, सुकदेव मावळे, अनिल चव्हाण, विजय चव्हाण, आदित्य चव्हाण, विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक यशवंत मोरे, मनोज बावस्कर, संदिप पवार , गिरीश जाधव, दिनेश बाविस्कर, विकास पाटील , संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सर्व पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापिका माया अंबटकर , मुक्ता पाटील, प्रतिभा सुर्यवंशी , सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
चित्रकार सुनिल दाभाडे यांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ज्वारीच्या भाकरीवरील पेंटीग जगातील पहिली ठरली त्यांची नोंद ओएमजी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.