जळगाव ( प्रतिनिधी ) – पपईच्या विक्रमी उत्पनाबद्दल प्रयोगशील शेतकरी मयुर वाघ यांचा आज राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
विकेल ते पिकेल या धोरणानुसार पपईचे दोन एकर क्षेत्रामध्ये 100 ते 110 टन पर्यंत विक्रमी उत्पादन घेऊन बांबरुड राणिचे येथील युवा आदर्श प्रयोगशील शेतकरी मयुर अरुण वाघ यांचा सत्कार करून त्यांना धनादेश देण्यात आला . या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत,
महापौर जयश्री महाजन , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर , अनिल भोकरे , , मधुकर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते .