जळगाव ( प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील व चि सौ का प्रेरणा यांच्या पाळधी येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज सायंकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ना छगन भुजबळ जळगावात येत आहेत
आज सायंकाळी पावणेसहा वाजता ना छगन भुजबळ जळगाव विमानतळावर उतरतील आणि ७ वाजता विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहचतील . नंतर रात्री सव्वा आठ वाजता जैन इरिगेशन कंपनीमध्ये स्नेहभोजन झाल्यावर ते रात्री साडे नऊ वाजता विमानाने मुंबईला जाणार आहेत .