जळगाव ( प्रतिनिधी )– महानगरपालिकेच्या 96 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश शासनाकडून झाल्यानंतर महानगरपालिकेने त्यापैकी 60 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले आहे .
महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हस्ते या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले तत्कालीन नगरपालिकेत रोजंदारीवर कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांना 1997 मध्ये कायम सेवेत सामावून घेण्यात आले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे कायम सेवेत घेता आले नव्हते म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी कायम सेवेत घेण्यात यावे यासाठी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज महानगरपालिकेने 60 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले आहे.