जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील औरंगाबाद मार्गावरील आदित्य लॉन्सच्या जागेच्या व्यावसायिक वापराचे ना – हरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रद्द करण्यात आले आहे .
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार यांनी सुनील रामनारायण मंत्री यांना १६ डिसेंबररोजी जारी केलेल्या आदेशात ( पत्र क्र / जमीन /१/३३/१६ / कावि / १५३ / २०२१ ) म्हटले आहे की , मेहरूण ( ता – जळगाव ) येथील गट नं ७९ मधील ५२०० चौ मी क्षेत्रफळाच्या भूखंडाची जी जागा त्यांच्या मालकीची आहे त्या जागेवर व्यावसायिक वापराचे ना-हरकत प्रमाणपत्र (क्र / जमीन /१/ बिनशेती/ एस आर / २०१७ / दि २२ /७/ २०२१ नुसार ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रद्द करण्यात आले आहे . तथापि औद्योगिक वापराचे ना – हरकत प्रमाणपत्र कायम ठेवण्यात आले आहे .
काहीच परवानगी न घेता या जागेचा व्यावसायिक वापर केला म्हणून आपल्यावर दंडाची कारवाई का करण्यात येऊ नये ? , याचा खुलासा करणारे समाधानकारक उत्तर जिल्हाधिकारी यांच्या समक्ष २३ डिसेंबररोजी उपस्थित राहून सादर करावे , असेही या आदेशात सुनील रामनारायण मंत्री यांना या आदेशात बजावण्यात आले आहे . या जागेचा व्यावसायिक वापर बेकायदेशीर असल्याची तक्रार चंद्रशेखर रामनारायण मंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात २३ नोव्हेंबर २०२१ रोजी दाखल केली होती .