एरंडोल ( प्रतिनिधी ) – येथे ग्रामीण रुग्णालयात आज एक महिला व तिची दोन मुले अशा तिघांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासनातर्फे पॉझिटिव आलेल्या या रुग्णांना तात्काळ मोहाडी रुग्णालय येथे हलवण्यात आले.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यां नागरिकांचा शोध घेऊन त्याचे स्वाब घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
एरंडोल शहरातील प्रणवनगर येथील रहिवाशी 17 वर्षीय युवक आठ दिवसांपूर्वी मुंबई येथे मामाकडे गेला होता तो आपले डिप्लोमाचे सर्टिफिकेट घेऊन एरंडोल येथे परत आला. चार दिवसापासून हा युवक एरंडोलला खाजगी उपचार घेत होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे काल सकाळी ग्रामीण रुग्णालय येथे स्वॅप घेण्यात आला तो पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या परिवारातील आई-वडील व लहान भाऊ यांना सुद्धा स्वाब तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणले युवकांच्या वडिलांनी दोघेही लसीचे डोस झाल्यामुळे त्याच्या अहवाल निगेटिव आला. 40 वर्षीय आई व इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला 13 वर्षीय भाऊ असे तीन अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले .
एरंडोल तालुक्यात सहा जुलैपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही परंतु काल म्हणजे शंभर दिवसांच्या विश्रांतीनंतर तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या 17 वर्षीय युवकाचा लहान भाऊ शहरातील एका विद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा स्वाब घेण्याची सूचना प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना दिल्या आहेत. नगरपालिकेस प्रणव नगर परिसरास कंटेनमेंट झोन बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत