वर्धा (वृत्तसंस्था) – कोरोना नावाच्या संकटाने भारतासह महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशाला लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात गहू ज्वारी हरभऱ्याची कापणी सुरू आहे. यातच पावसाचाही लपंडाव सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.तर ऐकीकडे कोरोनाच्या भितीमुळे मजूर शेतात येण्यास घाबरत आहे. दुसकडे ट्रॅक्टर चालकांना मुबलक डिझल मिळत नसल्याने तेही शेतकऱ्याचा शेतमाल काढून देण्यास असमर्था दर्शवत आहेत. या कोरोनामुळे जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढावल आहे. आता कोरोनाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी मायबाप सरकारने काही तरी मदत करावी अशी मागणी करत आहे.