बुलडाणा (वृत्तसंस्था) – राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच बुलडाण्यातही कोरोना रुग्ण हे दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलडाण्यामध्ये रात्री उशिरा परत 3 रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव आले आहेत. आता येथील कोरोना रुग्णआंचा आकडा 15 वर जाऊन पोहोचला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय. तर 14 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 162 ने वाढला आहे. महाराष्ट्रात आता 1297 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. मुंबईत 143 नवे रुग्ण वाढले आहेत. आता मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 857 वर गेली आहे. तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, बुलडाणा येथील कोरोना रुग्णही वाढताना दिसत आहेत.