नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरासह अमेरिकेतही कोरोनाने थैमान घातलं आहे. दरम्यान अमेरिकेने भारताकडे औषधींची मदत मागितली होती. यानंतर भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदीत झाले आहेत. यानंतर त्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट केलं आहे. तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहे. त्यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूच्या उपचारात वापरल्या जाणा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा पुरवठा केल्याबद्दल भारताचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. ट्वीटमध्ये ट्रम्प म्हणाले की, कठीण परिस्थितीत मित्रांमध्ये अधिक सहकार्याची आवश्यकता असते. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन विषयी निर्णय घेतल्याबद्दल भारत आणि तेथील जनतेचे आभार. ही मदत आम्ही कधीही विसरू शकत नाही. या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार.’ असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी नरेंद्र मोदींना फोन करुन करोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल असा धमकीवजा इशाराही ट्रम्प यांच्याकडून देण्यात आा होता. पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. तसेच ही मदत कधीच विसरणार नसल्याचेही म्हटले आहे.