नाशिक (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. नाशकातही कोरोनाचे रुग्यम दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोना विषाणूने मालेगावातही शिरकाव केला आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे. आता नाशकातील कोरोना रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. मालेगावातील 6 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळले आहेत. तर 1 कोरोना निगेटिव्ह आहे. या पाच जणांपैकी एकाचा बुधवारी मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.