मुंबई (वृत्तसंस्था) – रोहित शेट्टी बॉलीवूड चित्रपटांचे अष्टपैलू दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. विनोद असो वा अॅक्शन, रोहितला दोन्ही प्रकारचे चित्रपट बनवणे आवडते. रोहित शेट्टी हा आज इंडस्ट्रीत एक दिग्गज चित्रपट निर्माता असून अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंग या कलाकारांसोबत काम केले आहे. पण जेव्हा हा कलाकार सुरुवातीला इंडस्ट्रीत आला तेव्हा परिस्थिती वेगळी होती.रोहित शेट्टी यांचा जन्म 14 मार्च 1976 रोजी मुंबई येथे झाला होता. या अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याच्या आयुष्याविषयी आणि संघर्षाबद्दल काही खास गोष्टी. एका मुलाखती दरम्यान आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल बोलताना रोहित शेट्टी म्हणाले की, बऱ्याच प्रयत्नानंतर ते आपल्या शाळेत पोचत असे. ते पहाटे 5.49 च्या लोकल ट्रेनने अंधेरीला जायचे. यानंतर ते दुसर्या ट्रेनने सांताक्रूझला जायचे. यानंतर, उन्हात बसून त्यांना शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहावी लागत असे. वडिलांचे निधन झाले तेव्हा रोहित शेट्टीचा खरा संघर्ष सुरू झाला. रोहितचे आयुष्य खूप कठीण झाले. रोहितच्या आईने घराची देखभाल करण्यासाठी नोकरी सुरू केली.आज त्याचे चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहज सामील होतात. इतकेच नव्हे तर इंडस्ट्रीमधील तो एकमेव अभिनेता आहे, ज्याच्या बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. पण रोहित शेट्टी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात किती पगार घेत होता हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. दिवसा काम करण्यासाठी रोहितला फक्त 35 रुपये मिळायचे. पण दृढनिश्चय आणि परिश्रम घेऊन त्याने एक विशेष स्थान मिळवले.रोहित शेट्टीचा सध्या आगामी सूर्यवंशी चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात त्यांनी इंडस्ट्रीतील 3 बड्या स्टार्सना एकत्र रुपेरी पडद्यावर आणले आहे. अस करणं कोणत्याही दिग्दर्शकासाठी सोप नाही. रोहित शेट्टी यांचा पुढचा चित्रपट सूर्यवंशी हा एक कॉप ड्रामा चित्रपट आहे. यात अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंग महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. अक्षयच्या विरोधात कतरिना कैफ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना आवडला आहे.








