मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने, काल मुंबई मेट्रो २ मधील ५०८ झाडे काढून टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. यात १६२ झाडं कापलीही जाणार आहेत. आता १०० हून अधिक दिवस झाले तरी, वृक्ष संवर्धनाखाली दिलेली आरे कारशेडची स्थगिती अद्यापही उठवण्यात आली नाही. उध्दवा, अजब तुझे सरकार! अशा अशयाचे ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाना साधला आहे. त्यांच्या या ट्वीटला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे आहे.