नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – अलीकडे रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लग्नाची खूप चर्चा व्हायला लागली आहे. रिचा आणि अली फजलने 15 फेब्रुवारी रोजी बांद्रा कोर्टात मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केला आहे. महिन्याभराने म्हणजे 15 मार्च नंतर हे दोघेही केंव्हाही लग्न करू शकतात. रिचा चढ्ढा आणि अली फजलकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. त्या प्रोजेक्टचे काम बघता 31 मार्चपर्यंत त्यांना वेळच मिळणार नाही.
त्यामुळे एप्रिलमध्येच ते लग्न करू शकतील, असा अंदाज आहे. लग्नानंतर दिल्ली किंवा मुंबईमध्ये छानसे रिसेप्शन आयोजित केले जाऊ शकते. रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या एंगेजमेंटची बातमी स्वतः रिचानेच सोशल मीडियावरून पब्लिकला दिली आहे. आपल्या एंगेजमेंटचा फोटोही तिने पोस्ट केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या बोटात एक मोठी डायमंड रिंग दिसते आहे. तिने दोन अंगठ्या घातल्या असल्यासारखे दिसते आहे.
एकामध्ये मोठा डायमंड आहे आणि दुसऱ्या अंगठीमध्ये दोन डायमंड आहेत. रिचा आणि अली फजलची पहिली भेट 2012 मध्ये ‘फुकरे’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर 2015 मध्ये त्यांच्यातल्या डेटिंगला सुरुवात झाली होती. आता मार्च पर्यंतच्या काळामध्ये त्यांच्या लग्नाच्या तयारीचे आणखीन अपडेट येत राहतील.