मुंबई (वृत्तसंस्था) – आर्थर रोड कारागृहातील 77 कैदी आणि 26 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑर्थर रोड कारागृहात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पोलीस आणि कैदी मिळून 103 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करण्यात आले आहे. कारागृहात सध्या 2800 कैदी असल्याची माहिती आहे.