औरंगाबाद (वृत्तसंस्था) – शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आजही शहरात 18 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या ही 396 एवढी झाली आहे.या रुग्णांमध्ये जय भीम नगर 4, बेगमपुरा 4, भीम नगर भावसिंगपुरा, शहाबाजार, गारखेडा, एन-2 मुकुंदवाडी , कटकट गेट, सिकंदर पार्क मकसूद कॉलनी आणि खुलताबाद येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर बायजीपुरा परिसरात 3 नवे रुग्ण सापडले आहेत.