नवी मुंबई (वृत्तसंस्था) – रांची, लडाखमधील चीनच्या सीमावर्ती भागासह रस्ते उभारणीच्या कामासाठी झारखंडमधून 11 हजार मजूर रवाना झाले आहेत. अधिक चांगले वेतन आणि अन्य सुविधा पुरवण्याच्या अटीवर हे मजूर नेण्यास मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला ही परवानगी दिली.
बीआरओने लेखी संमती दिल्यानंतर 11 हजार 800 मजूर भरतीला मान्यता दिली आहे. त्याच बरोबर अवघड ठिकाणी काम करताना मजुरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याचे कंपनीच्या निवेदनात मान्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे सोरेन यांनी सांगितले.