नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मंगळवारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होती. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि मंत्रालयाचे सर्व अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीस उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व नियंत्रण कक्ष तयार करुन नियमित देखरेखीसाठी सूचना देण्यात आल्या. लॉकडाऊन दरम्यान नरेंद्र सिंह तोमर यांनी स्वतः शेतकर्यांच्या समस्येबाबत गृह मंत्रालय व अर्थ मंत्रालयाकडे संपर्क साधला. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबरोबरच सामाजिक अंतर कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बैठकीत या विषयांवर निर्णय घेण्यात आले. पीक काढणीत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये., शेतीमाल विक्री करता येईल यासाठी प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे., पीक वाहून नेण्यासाठी शेतकर्यांना राज्य व आंतरराज्य वाहनांची सुविधा असावी., – लॉकडाऊन दरम्यान पुढील पेरणी करावी लागेल, त्यामुळे खत बियाण्याची कमतरता भासू नये., निर्यात होणाऱ्या कृषी वस्तूंवर परिणाम होऊ नये., कापणी व पेरणीशी संबंधित उपकरणांच्या हालचालीला सूट देण्यात आली आहे., कृषी यंत्रसामग्रीची दुकाने लॉकडाऊन दरम्यान चालू राहणार आहेत., महामार्गावरील ट्रक दुरुस्त करणारे गॅरेज व पेट्रोल पंपही कार्यरत असतील., चहाच्या बागांवर जास्तीत जास्त 50 टक्के कर्मचारी ठेवून काम केले जाऊ शकते.