मुंबई (वृत्तसंस्था) – धुळे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन आहे. राज्यातही संपूर्णपणे बंद सुरू आहे. दरम्यान दुचारी आणि कारचा भीषण अपघात झाला. साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील नवडणे फाट्या जवळ दोन दुचाकी व इंडिका विस्टा यांच्यात रात्री 10:00 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये पिंपळनेरचे 2 युवक जागीच ठार झाले आहेत. तर पिंपळनेरठाण्याचा पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. या तिहेरी अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.