जळगाव – तालुक्यातील धानवड गावात कोरोना विषयक ( covid 19) सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला काम करू न देण्याची आणि तिचे घर जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानन्तर त्यांना अटक करण्यात आली आहे
धानावड येथील अंगणवाडी सेविका विजया बोरसे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या स्वतः त्यांच्या सहाय्यक आशा वर्कर नेत्रा पाटील, रेखा लोखंडे, ग्रामसेवक सुनील चौधरी आणि आरोग्यसेवक रवींद्र पवार यांच्यासोबत 29 एप्रिल रोजी सकाळी या गावात कोरोना सर्वेक्षण करीत होत्या. त्यावेळी इंदिरानगर भागातील एका किराणा दुकानाजवळ याच गावातील विजय पाटील व रवींद्र पाटील हे तोंडाला मास्क न लावता बसलेले होते या दोघांना तुम्ही विनाकारण असे तोंडाला मास्क न लावता का फिरत आहात अशी विचारणा विजया बोरसे यांनी केली होती त्यांना या बोलण्याचा राग येऊन त्यांनी विजया बोरसे यांच्या हातातील सर्वेक्षण रजिस्टर हिसकावून फेकून दिले आणि तू काम कशी करते तेच पाहतो तुझे घर जाळून टाकू अशी धमकी दिली . त्या दोघांना विजया बोरसे यांच्या सोबत च्या सहकारी कर्मचाऱ्यांनी समजावून सांगितले तरी ते एऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते त्यांनतर या घटनेची माहिती बोरसे यांनी वरिष्ठांना दिली व त्यांच्या सूचनेवरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांनतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या गावात जाऊन आरोपींना अटक केली
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच आरोपी यांना धानवड येथे जाऊन अटक करण्यात आली असून सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे अतुल वंजारी आनंद सिंग पाटील संतोष सोनवणे आसीम तडवी गोविंदा पाटील भूषण सोनार यांनी केली आहे