चोरवड भूमिपुत्र तथा उत्तर भारतीय रेल्वे कमिटी सदस्य आणि सुरत शहर भाजपा उपप्रमुख छोटूभाई पाटील , सुरत महानगरपालिकाच्या नगरसेविका रोहिणीताई पाटील यांच्या दातृत्वातून आयोजन
चोरवड ता. पारोळा (प्रतिनिधी) – येथील भूमिपुत्र तथा उत्तर भारतीय रेल्वे कमिटी सदस्य आणि सुरत शहर भाजपा उपप्रमुख छोटूभाई पाटील, सुरत महानगरपालिकाच्या नगरसेविका रोहिणीताई पाटील यांच्या संकल्पनेतून आज रोजी चोरवड येथे केंद्रीय पेट्रोलीयम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालय प्रमाणित होमिओपॅथिक गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने , सरपंच अनिल पाटिल, उपसरपंच मधुकर पाटिल , तसेच मल्हार कुंभार , रवी कुंभार, किशोर पाटिल, उल्हास पाटिल ,सतिष पाटील, भागवत पाटील, पुंजू साळवे, रविंद्र पाटील, सुरेश पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी गावकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळत या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या आजच्या वातावरणात गोळ्यांचे वाटप करून छोटूभाई पाटील यांनी आपल्या गावांच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न केला असून या गोळ्यांचे वाटपाने जेष्ठ आबाल वृद्ध सर्वाना दिलासा मिळाला आहे .गावकऱ्यांनी देखील गरज असेल तेव्हा घराबाहेर पडावे घरी रहावे सुरक्षित रहा.असे आवाहन करून छोटुभाई पाटील आणि रोहिणीताई पाटील यांचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी अभिनंदन केले.या गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.याप्रसंगी छोटुभाई पाटील यांच्या घरासमोर खासदार उन्मेश दादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.