पुणे (वृत्तसंस्था) – चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला करोनाची धडकी भरली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्शवभूमीवर आता सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य आणि चित्र गौरव पुरस्कार’ पुढे ढकलण्यात आला आहे. उद्या हा (दि. १३ मार्च) पुरस्कार सोहळा रंगणार होता. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे पुरस्कार पुढे ढकलण्यात आला.तसेच , ‘अश्रृंची झाली फुले’ या नाटकाचे अमेरिकेतील दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती सुद्धा अभिनेता सुबोध भावेने दिली आहे होती.