मुंबई – मध्यप्रदेशात भाजपने सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसांपूर्वीच फसलंय. त्यामुळे मध्यप्रदेशचा लोटस व्हायरस महाराष्ट्रात येणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत ही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मधयप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही. चिंता नसावी, असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे.