औरंगाबाद (वृत्तसंस्था) – कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढती संख्या लक्षात घेता शहरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तूव्यतिरिक्त शहरात कोणतेही दुकानं उघण्यास अद्यापही परवानगी देण्यात आली नाहीये. सध्या औरंगाबादेत ऑड इव्हन फॉम्यूला लागू करण्यात आला आहे. या फॉर्म्यूल्यानुसार सम विषम तारखेप्रमाणे शहरात नवीन नियम लागू करण्यात आले आहे. सम तारखेला सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकाने खुली ठेवण्यात येत आहे. तर विषम ताखेला शहरात कडकडीत बंद पाळला जाणार आहे. मात्र असं असलं तरी यामधून अत्यावश्यक सेवा तसेच आरोग्य सेवेला वगळण्यात आलं आहे.
सध्या औरंगाबादेत कोरोनाचे 321 रुग्ण असून यातील 11 रुग्णांचा बळी गेला आहेत. तसेच 25 रुग्ण या आजारातून बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्य सरकारने सर्व दुकानं आस्थापना उघडण्याची मुभा दिली असली तरी बाकी सर्व अधिकार जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिले आहे. त्यानुसार सध्या औरंगाबादेत लॉकडाऊनच्या नियमामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाहीय. प्रत्येक तीन दिवसांनी आम्ही आढावा घेऊ असं मनपा आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.