जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादृर्भाव होवु नये , याकरीता शासन स्तरावर मोठया प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.त्याअनुषांने देशात तसेच राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन शासनाकडुन विवीध उपाय योजना करण्यात येत आहे.
परंतु पोलीस अधीक्षक जळगाव यांचे असे निदर्शनास आले आहे की, जळगाव जिल्हयात ब-याच भागामधील नागरिक हे येण्या -जाण्या करीताचा सार्वजनिक रस्ता स्वतः बंद करतात त्याकरीता ते बॅरीकेट / अडथळे लावुन सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण करीत आहेत.असे सार्वजनिक रस्ते बॅरीकेट / अडथळयाव्दारे जे कोणी नागरिक बंद करतील त्यांचे विरुध्द जळगाव जिल्हा पोलीस दला करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस दलात असे कृत्य करणा-या नागरिकांवर गोपनिय देखरेख ठेवण्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जो कोणी येण्या- जाण्याचा सार्वजनिक रस्ता बॅरीकेट / अडथळे लावुन बंद करतील अशांची पुराव्या निशी माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला तात्काळ दयावी. माहिती देण्या-याचे नाव गोपनिय ठेवले जाईल व माहितीची खात्री करुन संबंधीतावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
तसेच जनजागुती करीत असतांना समाजातील काही व्यक्ती सोशल मिडीया, फेसबुक ,व्हाटसअँप व्दारे कोरोना रोगाच्या अनुषंगाने दोन धर्मात , दोन जातीत तेढ , तिरस्कार निर्माण होईल असे संदेश प्रसारित करीत होते त्यांचेवर आता पावेतो खालील प्रमाणे १० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
(१) जळगाव तालुका पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.५७/२०२० भादवि.क.१५३ (अ),२९५(अ),५०५(२) सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ कलम ५२, (२)पाचोरा पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.१३८/२०२० भादवि.क. २९५(अ),माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७, (३)चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.२४/२०२० भादवि.क.१५३ (अ),२९५(अ),५०५(२) सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ कलम ५२, (४)MIDC पोलीस स्टेशन भाग-५ गुरन.३३०/२०२० भादवि.क.१८८, ५०५(ब), ५०५(क), (५)भुसावळ शहर पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.१५६/२०२० भादवि.क.५०५(२),१८८, (६)जळगाव शहर पोलीस स्टेशन भाग -६ गुरन.३०६५/२०२० भादवि.क.५०५(२), (७)रामानंदनगर पोलीस स्टेशन भाग -६ गुरन.३०६५/२०२० भादवि.क.५०५(२), (८)निभोंरा पोलीस स्टेशन भाग -६ गुरन.०९/२०२० भादवि.क.५०५(२), (९)अमळनेर पोलीस स्टेशन भाग – ६ गुरन.१९५/२०२० भादवि.क.१८८,५०५(१)(क),साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४, (१०)शनिपेठ पोलीस स्टेशन भाग-०५ गुरन.२२/२०२० भादवि.क.१५३ (अ),२९५(अ),५०५ सह महाराष्ट्र व्यवस्थापन कायदा सन – २००५ चे कलम – ५२ प्रमाणे.