अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुंदरपट्टी ,बहाद्दरवाडी व शहरातील एका वर अश्या एकूण 12 जणा वर सोशियल मीडिया ग्रुप वर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडीओ टाकल्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.सविस्तर माहिती अशी की, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक गोष्टी वर कायदेशीर बंधनं घातलेली असतांना अमळनेर तालुक्यातील सुंदरपटी व बहादरवाडी येथे मारोती मंदिरासमोर बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी व सुंदरपट्टी बहादरवाडीसह अमळनेर येथे सोशल मीडियावर आक्षेपार्हय व्हिडिओ टाकल्याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार बहादरवाडी येथील दीपक नंदू पाटील, संतोष बाबुराव पाटील , पवन संतोष पाटील, रवींद्र बाबुराव पाटील, तर
सुंदरपट्टी येथील मिठाराम देवराम पाटील, भिका साहेबराव पाटील, अरुण रामकृष्ण पाटील, राहुल नाना पाटील, विनोद नीलकंठ पाटील, भीमराव पीतांबर पाटील , चतुर कैलास पाटील, गोकुळ देवराम पाटील यांच्याविरुद्ध ग्रामसेवक राधा चव्हाण यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अमळनेर शहरात अमळनेर १०० या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हीडिओ टाकल्याबद्दल ओमप्रकाश मुंदडा यांच्याविरुद्ध पोलिस नाईक शरद पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, शासकीय नियमांचे उल्लंघन केले म्हणून भादवी १८८, ५०५ व साथीचे रोग अधिनियम १८९७ च्या कलम २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.