मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचना पाळूया आणि यशस्वीपणे जिंकत इतिहास घडवूयात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले कि, महात्मा फुले जयंतीला ज्ञानाचा दिवा पेटवावा, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला संविधानासाठी दिवा लावा. शब्बे बारातला घरातूनच प्रार्थना करा. अंधश्रद्धेला बळू पडू नका. दैववादी माणसं चिकित्सक होऊ शकत नाहीत. ज्ञानाचं समर्थन करणारी भूमिका स्वीकारा. काळजी घेतली तर कोरोनावर मात करणं शक्य आहे. १३ दिवस घरात राहिलात, यापुढेही आणखी काही दिवस घरातच राहा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तर ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, समाजाताली सर्व घटकांनी एकत्र राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावरील मेसेज काळजी करण्यासारखे आहे. कारण पाचपैकी चार मेसेज खोटे असतात. संशय, कटुता वाढेल अशी स्थिती उद्धभवता कामा नये. आणि वास्तव पुढं आलं तर वारंवार त्याची मांडणी करुन त्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज निर्माण केला जात आहे. हे कुणी मुद्दामून करत आहे का याबद्दल शंका वाटते, असेही शरद पवार यांनी यावे