नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाविरुद्धची ही लढाई फार मोठी आहे. आपण त्यासाठी सज्ज आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.नरेंद्र मोदी म्हणाले कि, सध्या सर्वत्र करोनाने थैमान आहे. तरीही आपण खंबीरपणे पुढे जात आहोत. प्रत्येक नागरिक आज स्वत:ला आणि देशाला वाचवण्यासाठी लढतोय. प्रत्येक भारतीय आज एकत्र, एकसंध आहे. करोनाची लढाई ही मोठी लढाई आहे. यात आपल्याला जिंकायचं आहे. लढून पुढे जायचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.तसेच भारत हा विकसनशील देश आहे. आपण गरीबीसारख्या मोठ्या प्रश्नाशीही लढत आहोत. तर दुसरीकडे करोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या प्रयत्नांची सर्व जगभरात कौतुक होत असून जागतिक आरोग्य संघटनेनेही प्रशंसा केली आहे. करोनाशी लढताना आपण सर्व देशांसमोर एक उत्तम उदाहरण सांगितले. मोदींनी सांगितलेले पाच संकल्प – १. गरिबांच्या राशनसाठी अविरत सेवा अभियान., २. आपल्यासोबतच घरातल्या इतरांना मास्क द्या., ३. धन्यवाद अभियान राबवा., ४. आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करायला लावा., ५. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने सहयोगी करावे, ४० लोकांकडून पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्यास सांगा.