मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रातील पालघरच्या अनेक भागात सोमवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. त्यामध्ये कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे महानगरपालिकेच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे .प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, भूकंपाची रिश्टर स्केलवर 3.1 नोंद करण्यात आली आहे. त्याचे भूकंपाचे केंद्र डुंडलवाडी गावात होते. गेल्या आठवड्यात याच भागातही हलका भूकंप झाला होता. पालघरच्या डहाणू भागात नोव्हेंबर 2018 पासून या प्रकारचा भूकंप होत आहे. यापैकी बहुतेक भाग डुंडलवाडी गावचे केंद्र आहे. तसेच हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात सोमवारी पहाटे 3.1 च्या तीव्रतेसह भूकंपाचे धक्के जाणवले. अशी माहिती हवामान खात्याने ही माहिती दिली. शिमला हवामान केंद्राचे संचालक मनमोहन सिंग यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी 7.03 वाजता भूकंप झाला. गेल्या 11 दिवसातील चंबा जिल्ह्यात हा आठवा भूकंप आहे. सिंह म्हणाले की, भूकंपाचे केंद्र चंबाच्या ईशान्य दिशेला पाच किलोमीटर अंतरावर होते. यावेळी आजूबाजूच्या भागातही भूकंपाचे हलके धक्के जाणवले. यापूर्वी 27 ते 30 मार्च दरम्यान जिल्ह्यात 3 ते 4.5 तीव्रतेचे सात भूकंप झाले होते . चंबासह हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग भूकंपांच्या अतिसंवेदनशील भागात येतो.