मुंबई (वृत्तसंस्था) – साताऱ्यात चौदाव्या दिवशी करोनाची निगेटिव्ह टेस्ट आलेल्या ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्याची कालची टेस्ट निगेटिव्ह आली होती. पंधराव्या दिवसाचा स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा म्रुत्यू ह्रदयविकाराने झाला असावा, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. तथापि, पंधराव्या दिवसाच्या स्त्रावाचा रिपोर्ट आल्यावर नेमके कारण सांगता येईल, असे श्री. सिंह यांनी स्पष्ट केले.कॅलिफोर्नियातून १७-१८ मार्चला आलेला हा जिल्ह्याचा पहिला बाधित रुग्ण होता. काल चौदाव्या दिवशी त्याची टेस्ट निगेटिव्ह आली होती.