अमळनेर (प्रतिनिधी) – येथील दलित नेते तथा कामगार नेते रामभाऊ संदानाशिव यांचे पुत्र नगरसेवक नरेंद्र संदानाशिव यांनी आपल्याला लाभलेला सामाजिक वसा व माणुसकीच्या भावनेतून शहरातील गोरगरीब तथा कष्टकरी लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किराणा मालाचे वाटप केले.शहरातील हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यातच कोरोनाचा पार्श्वभूमीवर रोजगार बंद असल्यामुळे गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये व तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी अमळनेर नगरीचे नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांनी आपली वडीलांच्या मार्गदर्शना खाली गरजवंतांना घरपोच किराणा देण्याचा निर्णय घेतला व अमळनेर शहरातील गरीब- कष्टकरी हालकीची परिस्थिती असलेल्या कुटूंबाना किराणा वस्तू घरपोच जाऊन वाटप केले.याप्रसंगी नरेंद्र संदानाशिव यांनी शहर वाशियांनाही आवाहन केले की, प्रत्येकांनी मदतीचा हात पुढे करावा व माणुसकी जपावी. नरेंद्र संदानाशिव त्यांच्या या मदतीने गरीब लोकांनी त्यांचे मनापासून आभार मानले, त्यांना या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघ यांचे सहकार्य मिळाले.