नवी दिल्ली: देशात लागू असलेला लाँँकडाऊन ३ मे पर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली. यावेळी मोदी बोलले
7 गोष्टींमध्ये मला तुमची मदत पाहिजे आहे.
– घरातील वृद्ध लोकांची देखभाल करा
– लोकडाऊन चे पालन करा ; मास्क वापरा
– Immunity वाढवण्यासाठी गरम पाणी, काढा वापरा
– आरोग्य सेतू मोबाईल अँप डाउनलोड करा.
– शक्य तितक्या गरीब कुटुंबांची देखभाल करा
– कोणाला नौकरिवरून काढू नका
– कोरोना योद्धांचे सम्मान करा, त्यांचा आदर करा. 3 मे पर्यंत लॉकडाऊन च्या नियमांचे पालन करा, आहेत तिथेच राहा.