वावडदा (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे आज दि.१३ रोजी सायंकाळी ५ वाजता उपपोलिस निरीक्षक विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भट्टीवर पोलिस पाटील व सरपंच यांनी मोठी कारवाई करुन दारू निर्मात्याचे रसायन नष्ट केले.
गावांतील तरुणांना शेतात गावठी दारूची हात भट्टी असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता हात भट्टी दारू तयार करण्यासाठी असलेले रसायन मिळून आले ही बाब त्यांनी पोलीस पाटील देविदास राजाराम पाटील व सरपंच राजाराम धिंगा चव्हाण यांनां सांगितली असता त्याठिकाणी जाऊन गावठी दारू निर्मितीसाठी असलेले सुमारे दोनशे लिटर रसायन जागेवर नष्ट केले गावातील तरुणांची ग्राम दक्षता समिती तयार करून कोरोना संदर्भात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीसांच्या या कगरवाईत ताडी दारू पण पकडली गेली असल्याचे समसते पोलिसांच्या व्यवस्थेच्या गैरफायदा दारू तयार करणाऱ्यांकडून घेतला जात होता कोरोना ग्राम जनजागृती समितीने गावात लोकांची गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली