शिरसोली (प्रतिनिधी)- येथील कु.गायत्री तुकाराम अस्वार (वय 16 वर्ष राहणार इंदिरानगर, शिरसोली प्र.न.) या इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थीनीने आज दुपारी राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडील – तुकाराम व आई- मंगलाबाई शेतात कामावर गेले असता मुलीने आज 12 वाजेच्या सुमारास राहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात काल दहावीचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे गायत्री टेन्शन मध्ये होती. या तणावामुळे तिने गळफास घेतला असावा असे बोलले जात आहे. तिच्या पश्चात 1 भाऊ, 1 बहीण, आई-वडील असा परिवार आहे. पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर देऊन तिला अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. आज सायंकाळी गायत्रीच्या मृतदेहावर शिरसोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.