चाळीसगाव (प्रतिनिधी) – कोरोना विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या जनता करफ्यूची घोषणा केली असून यासाठी पोलीस प्रसाशन सज्ज झाले आहे.आपल्या आरोग्याची आणि आपल्या परिवाराची चिंता न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांच्या पावलावर पाऊल ठेवत आज पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या मुलांनी अर्थात पोलीस बॉईजने पोस्टर जनजागृती करीत एक प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे अभिनंदन करतो आणि जनतेला आवाहन करतो की कोरोना व्हायरसची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वांनी उद्या जनता करफ्यूचे पालन करू या असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे. शहरातील सिग्नल चौकात पोलीस बॉईज ने रस्त्याच्या चारही बाजूला उभे राहून पोस्टर जनजागृती केली यावेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रावसाहेब कीर्तिकर, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार,रवी राजपूत, अमोल चव्हाण, संदीप गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.