मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत 52 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यावरून मुंबईत आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 330 वर पोहचली आहे. तसेच आज दिवसभरात मुंबईत 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या चारही रुग्णांचे वय 50 पेक्षा जास्त असून दिवसांदिवस वाढत चालेल्या या आकड्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.