• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणं हीच दोन मोठी आव्हानं- उपमुख्यमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असंही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळाबंदीनं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हानं आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहोचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यांत दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत असताना राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावर उतरुन गर्दी करणं टाळावं. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यात आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेनं काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं, असंही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


 

 

Previous Post

कोरोनाच्या अंधकारात दिवे, मेणबत्ती, टॉर्चच्या उजेडात उजळणार आसमंत

Next Post

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 690 वर; 24 तासांत 55 रुग्णांची वाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 690 वर; 24 तासांत 55 रुग्णांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon