पाचोरा ( प्रतिनिधी) – भारतात कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रातहि संक्रमित रुग्ण आढळून येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रही लॉक डाऊन करण्यात आला आहे. यामुळे गोर गरीब ,हातमजुरी करणारे हताश होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे मतदारसंघात कोणी गोर गरीब ,हात मजुरी करणारे उपाशी राहू नये याकरिता पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचे संकल्पनेतून शिवसेना युवासेना तर्फे पाचोरा भडगाव मतदारसंघात रोज सकाळी व संध्याकाळी चार ते पाच हजार गरीब गरजू कुटुंबियांना जेवण्याची व्यवस्था करीत आहे. याकामी उद्योजक मुकुंद बिलदीकर शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पाटील भरत खंडेलवाल, संतोष गौड, सुनील गौड, शरद पाटील, सुमित सावंत सह पाचोरा-भडगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहे.