नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनका व्हायरसचे सर्वात जास्त प्रकरणं हे अमेरिकेमध्ये समोर आले आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह केसेस झपाट्याने वाढत आहे. याच काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत मागितली आहे. यावेळी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन टॅबलेट्सचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घातले आहे. अमेरिकेत तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी बातचिक केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या देण्याची विनंती केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच अमेरिकेची हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ऑर्डर जाहीर करण्यास सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘भारत मोठ्या प्रमाणात या औषधांची निर्मिती करते. भारताची संख्या 1 अरब पेक्षा जास्त आहे. त्यांना त्यांच्या नागरिकांसाठीही या औषधीची गरज आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर ही ऑर्डर पाठवली तर मी त्यांचा आभारी राहिल’. अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर केला जात आहे.