जळगाव शहरात कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महा नगर पालिकेतर्फे शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे यामुळे या रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव न होण्यास मदत होणार असल्याने महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केलेल्या विनंती नुसार आणि सामाजिक
बांधीलकी म्हणून जैन इरिगेशन ने कंपनी कडील असलेल्या अग्निशामक यंत्रावर ( फायर फायटर) त्वरित स्प्रे करण्याची खास यंत्रणा कार्यान्वित करुन महापालिकेस उपलब्ध करून दिले आहे , या यंत्रात असलेल्या स्प्रे द्वारे 100 फूट अंतरापर्यन्त फवारणी केली जाते त्यामुळे कमी कालावधीत शहराच्या अधिक भागात हे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे