मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाचा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला आहे. याला रेल्वे देखील अपवाद नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्यांतील प्रवासी संख्या घटली असल्याने मध्य रेल्वेकडून 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या विभागांतील स्थानकांहून मडगाव, मंगळूरू, सिकंदराबाद, जालना, एर्नाकुलम, काझिपेठ आदी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. पुणे विभागांतर्गत धावणाऱ्या 12 गाड्यांचा समावेश आहे. पुणे विभागातील रद्द गाड्या – भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस – 20 ते 31 मार्च , – मिरज-हुबळी-मिरज एक्स्प्रेस – 20 ते 31 मार्च, – कोल्हापूर-मनुगुरू , क्स्प्रेस – 20 ते 31 मार्च, – मनुगुरू-कोल्हापूर एक्स्प्रेस – 21 ते 31 मार्च, – कोल्हापूर-बिदर एक्स्प्रेस – 25 मार्च, – बिदर-कोल्हापूर एक्स्प्रेस – 26 मार्च, – पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस – 20 ते 31 मार्च, – पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस – 20 ते 31 मार्च, – पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस – 20 ते 31 मार्च, – सोलापूर-कोल्हापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस – 20 ते 31 मार्च, – कोल्हापूर-सोलापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस – 21 ते 1 एप्रिल, – सोलापूर-मिरज-सोलापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस – 20 ते 31 मार्च, – जबलपूर-पुणे एक्स्प्रेस – 23 आणि 30 मार्च, – पुणे-जबलपूर एक्स्प्रेस – 24 आणि 31 मार्च, – हबीबगंज-धारवाड एक्स्प्रेस – 27 मार्च, – धारवाड-हबीबगंज एक्स्प्रेस – 28 मार्च, अन्य विभागांतील रद्द गाड्या, – लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड एक्स्प्रेस – 25 मार्च
– नांदेड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस – 26 मार्च, – लोकमान्य टिळक टर्मिनस -बिदर एक्स्प्रेस – 24 ते 31 मार्च, – बिदर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस – 25 मार्च ते 1 एप्रिल, – लोकमान्य टिळक टर्मिनस -काझीपेट ताडोबा एक्स्प्रेस – 20 ते 27 मार्च, – काझीपेट- लोकमान्य टिळक टर्मिनस ताडोबा एक्स्प्रेस – 21 ते 28 मार्च, – लोकमान्य टिळक टर्मिनस -मडगाव डबलडेकर एक्स्प्रेस – 23, 26 आणि 30 मार्च.