मुंबई (वृत्तसंस्था) –कोरोना व्हायरसचा प्रसार भारतात वाढत चालला आहे. आतापर्यंत जवळपास 150 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आपल्या हातातील डिव्हाईसवरील व्हायरपासून देखील संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये मोबाईल स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. मात्र फोन साफ करताना योग्य केमिकल वापरन व्यवस्थितरित्या साफ करणे गरजेचे आहे, अन्यथा फोन खराब होऊ शकतो.
स्मार्टफोनला साफ करताना ब्लिचिंग पाउडरचा वापर केल्यास फोनचा डिस्प्ले खराब होईल व बॉडीचा रंग उडेल. या शिवाय विनेगरचा देखील वापर करू नये.
अॅपलनुसार, आयफोन स्वच्छ करण्यासाठी कोणताही स्प्रे वापरणे धोकादायक आहे. फोनला स्वच्छ करण्यासाठी त्याला कोणत्याही तरळ पदार्थात बुडवू नका. मोबाईल स्वच्छ करण्यासाठी थेट अल्काहोलचा वापर करू नका.